आदरणीय देणगीदार,
आपण दिलेल्या तसेच वेळोवेळी करत असलेल्या देणगी बद्दल धन्यवाद!!!
आपण करत असलेल्या देणगी मध्ये आयकरात 80G कलमान्वये सवलत मिळू शकते.त्या संदर्भात खालील बाबी दिल्या आहेत.
१. रोखीने केलेल्या रुपये २००० पर्यंतच्या देणगीच 80G अंतर्गत आपण आयकरात सवलत घेऊ शकता. उदा. जर आपण रुपये २१०० रोख दिली असेल तर ती देणगी 80G अंतर्गत अपात्र आहे.तसेच आपण जर रुपये २०००/- पर्यंतची आपली देणगी असल्यास ती देणगी 80G अंतर्गत पात्र आहे.
२. आपण रोखी व्यतिरिक्त इतर माध्यमातून दिलेली (चेक,कार्ड,UPI/QR,बँक ट्रान्सफर,नेटबँकिंग) सर्व देणग्यांच्या वर आपण 80 G अंतर्गत आयकरात सवलत घेऊ शकता.
या साठी आपल्याला आपली माहिती आमच्या वेबसाइट वर लॉगिन करून आपले PAN किंवा AADHAR नंबर अद्ययावत करावे लागेल.आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या देणगी वरील आयकर सवलत घेण्यासाठी ज्यांनी माहिती अद्ययावत केली नाही त्यांना ३० एप्रिल पर्यन्त माहिती अद्ययावत करावी लागेल.
आपले नम्र-
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ,अक्कलकोट.